भूम तालुक्यात पावसाचा हाहाकार, बेलगाव पिंपळगाव येथील शेतकऱ्याच्या २७ गाई दगावल्या २० शेळ्या,१५० कोंबड्या पुरात वाहून गेल्या पावसाच्या महाप्रकोपामुळे शेतकरी देशोधडीला-
धाराशिव, /प्रतिनिधी रूपेश डोलारे दि. २३ : धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा तालुक्यात(Paranda Taluka) गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या विक्रमी पावसामुळे महापुराने थैमान घातले आहे. या दोन तालुक्यांतील परिस्थिती अत्यंत गंभीर असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आतापर्यंत ९२ गावे(Villege) बाधित झाली असून, ६२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागात लष्कर, एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफच्या (SDRF) तुकड्या दाखल झाल्या असून हेलिकॉप्टर व बोटींच्या सहाय्याने बचावकार्य वेगाने सुरू आहे.
भूम तालुक्यात मध्यरात्री अचानक ढगफुटी सारख्या मुसळधार पाऊस(Rain) आणि त्यानंतरचा महापूर यामुळे भूम तालुक्याच्या ग्रामीण भागात (Rural Area)मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे तालुक्यातील साडीसांगवी ,चिंचपूर ,बेलगाव पिंपळगाव (Belgaov Pimpalgaov) येथील शेतकरी बांधवाचे घर आणि शेती पाण्याखाली वाहून गेली आहे तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे धान्य साठवण, सोलर पंप, कडबा ,ट्रॅक्टर,(Tractar) खत सर्व काही नष्ट झाले .शेतकरी विश्वनाथ दातखिळे यांच्या पशुधनाची मोठ्या आर्थिक नुकसान झाले यामध्ये 30 ते 35 लाखाची नुकसान झाले आहे त्यांच्या 10 गाई(Cow) वाहून गेल्या 17 गाय दावणीला दगावल्या तर 20 शेळ्या,(Goats) 150 कोंबड्या(Hens)) पशुखाद्य पोते ,वर्षभराची धान्य साठवण सर्व काही महापुरा मध्ये वाहून गेले . त्यामुळे पशुपालक प्रचंड अडचणीत सापडला आहे तसेच साडीसांगवी येथील शेतकरी ज्ञानेश्वर डोंबाळे यांचीही 90 ते 100 जनावरे (Animals) वाहून गेली असल्याची माहिती मिळत आहे . तालुक्यातील पाझर तलाव फुटल्याने संकट आणखीन वाढले आहे बाणगंगा नदीवरील (Banganga Nadi) पुलावरील लोखंडी कठणी वाहून गेले त्याचबरोबर स्मशानभूमीची जाळी पाण्यात नष्ट झाली तर नदीवरील लाईटचा पूल तुटून पडला त्यामुळे शेतकरी(Farmers) सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे याप्रकरणी सरकार मायबाप यांनी तातडीने लक्ष घालून तात्काळ या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
या महापुराचा सर्वात मोठा फटका शेतीला बसला आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यातील ९२ गावांमधील ६४,०२९ शेतकऱ्यांचे ६२,९८९ हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिरायत पिकांचा समावेश आहे. भूम तालुक्यात अतिवृष्टीमुळे वारेवडगाव, हिवरडा, वालवड यांसह अनेक पाझर तलाव फुटल्याने पूरस्थिती आणखी बिकट झाली आहे.
हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी आपली जनावरे आणि कुटुंबियांसह तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


0 Comments