चिवरी परिसरात पावसाचा कहर खरिपातील पिकांचे मोठे नुकसान
चिवरी/प्रतिनिधी राजगुरु साखरे :तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात मागील दोन दिवसापासून झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, मुग आणि तूर यांसारख्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सलग दोन दिवसांपासून परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवार गुरुवार या रोजी दिवसरात्र मुसळधार पावसाने कहर माजवला होता यामध्ये परिणामी सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे.या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले असून काढणीला आलेल्या सोयाबीनला कोंब फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही .तसेच खरीप हंगामातील सोयाबीन हे परिसरातील मुख्य पीक असल्याने शेतकऱ्याची आर्थिक मदार अवलंबून आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून सरसकट आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी बांधवतून होत आहे.

0 Comments