"दान पावलं" म्हणत मतांचं दान मागण्यासाठी शहापूर गटात दयानंद वासुदेवाची राजकारणामध्ये एंट्री-Itkal Tuljapur News Daily

Hot Posts

6/recent/ticker-posts

"दान पावलं" म्हणत मतांचं दान मागण्यासाठी शहापूर गटात दयानंद वासुदेवाची राजकारणामध्ये एंट्री-Itkal Tuljapur News Daily

"दान पावलं" म्हणत मतांचं दान मागण्यासाठी शहापूर गटात दयानंद वासुदेवाची राजकारणामध्ये एंट्री- 


---------------------------------------

इटकळ (दिनेश सलगरे):-  तुळजापूर तालुक्यातील मौजे गुळहळ्ळी गावात जन्मलेल्या आणि बाभळगावात वास्तव्यास असणारे लोककलावंत तथा वासुदेव दयानंद काळुंके यांनी "दान पावलं" म्हणत मतांचं दान मागण्यासाठी राजकारणात एंट्री केली असुन येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शहापूर जिल्हा परिषद गटात त्यांचा प्रचार हा लक्षवेधीच ठरणार असल्याचे दिसुन येत आहे.दयानंद काळुंके हे महाविद्यालयीन जीवनापासून लोककलावंत आहेत,ते महाराष्ट्रीय सर्व लोप पावणा-या लोककला जिवंत ठेवत अवगत कला सादर करीत लोकांचे मनोरंजन व प्रबोधन केले आहे .१९९२ मध्ये बिड येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात वासुदेवाची भूमिका करुन सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले तेंव्हापासून आजतागायत त्यांच्या नसानसात वासुदेव भिनला आहे, म्हणूनच त्यांना वासुदेव म्हटलं जातंय गेल्या ३२ वर्षांपासून जपलेली वासुदेवाची कला सध्या कामी येत आहे.शहापूर मतदार संघ हा अनुसूचित जाती पुरुष वर्गासाठी पडला आहे त्यामुळे दान पावलं म्हणत मतांचं दान मागण्यासाठी दयानंद काळुंके या वासुदेवाची राजकारणामध्ये एंट्री झाली आहे,वासुदेव हा धार्मिक भिक्षेकरी आहे, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात वासुदेवाचे खुप मोठे महत्त्व आहे, वासुदेव ही समाजप्रबोधन करणारी यंत्रणा आहे म्हणून वासुदेवाचा गौरव केला जातो, दयानंद काळुंके यांनी शहापूर मतदार संघातील प्रत्येक गावोगावी जाऊन प्रबोधन आणि मनोरंजन केले आहे,त्यांना येथील गावच्या प्रश्नांची जाण व उकल असल्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांच्या अंगणापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत!

दयानंद काळुंके यांनी महाविकास आघाडीकडे आपल्या तिकीटाची मागणी केली असुन एका लोककलावंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता, आणि वासुदेवाला तिकीटाच दान मिळणार आहे का? याकडे लक्ष लागले आहे,सध्यातरी मतदार संघात दयानंद काळुंके यांच्या नावाची चर्चा मोठ्याप्रमाणात सुरू आहे.ही लोकशाही जीवंत व सुरक्षित ठेवण्यासाठी स्वच्छ, चारित्र्य संपन्न,निष्कलंकीत, निस्वार्थी, निर्व्यसनी उमेदवाराची गरज असल्याने राजकारणामध्ये वासुदेव असणा-या दयानंद काळुंके सारख्या उमेदवाराची गरज असल्याची चर्चा सध्या शहापूर मतदार संघात केली जात आहे.

Post a Comment

0 Comments