संतापजनक घटना : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल राशिव जिल्ह्यातील घटना-
धाराशिव / प्रतिनिधी रुपेश डोलारे: तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्याचे हद्दीतील एका गावात 32 वर्षीय पीडित महिलेचे आंघोळ करताना चे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमाने 12 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 27 ऑक्टोबर च्या दुपारी 12 वाजेच्या सुमारास पीडित तिच्या घरी असताना गावातील आरोपी तरुण तिच्या घरात घुसला त्यांनी महिलेचे खाजगी क्षण कॅमेरात कैद केले असल्याचा दाखून ते छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली या धमकीचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला ;अशी माहिती तक्रारीत नमूद केली आहे. पिडीतिने या घटनेबद्दल धीर धरून 12 नोव्हेंबर रोजी रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ गुन्हा नोंदवला आहे आरोपी विरुद्ध भारतीय न्याय समितीचे कलम 64 (1) लैंगिक अत्याचार बलात्काराची शिक्षा कलम 351 (2) (3) कलम 332, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमचे 3 (2) (व्हि) वनवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून या प्रकरणाचा पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.

0 Comments