नळदुर्ग येथील दिशा पतसंस्थेच्या चोरी प्रकरणात लिपिकच निघाला मास्टरमाइंड,पावणेपाच किलो सोन्यासह रोकड लंपास, लिपिकास अटक ,चार जणावर गुन्हा दाखल-
धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील दिशा नागरी सहकारी पतसंस्थेची तिजोरी फोडून चोरट्याने एकूण 2 कोटी 63 लाख 63 हजार रुपयाचा मुद्देमाल लुटून नेला याप्रकरणी पतसंस्थेच्या लिपिकासह चार जणांच्या विरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यात शनिवार दिनांक 8 रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे .पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाची चक्री गतिमान करून याप्रकरणी लिपिकास अटक केली आहे चोरीच्या मुद्देमालातील 25% वाटा मिळवण्याच्या लालसेपोटी बँकेचा लिपिक राहुल जाधव यांनीच तिजोरी लुटण्यासाठी चोरांना मदत केल्याचे उघड झाले आहे. या विश्वासघातामुळे पतसंस्थेच्या 263 सभासदांचे पावणे तीन कोटी रुपयांची सोने आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे या धक्कादायक चोरी प्रकरणामुळे ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की नळदुर्ग येथील दिशा नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात चोरट्याने शुक्रवार दिनांक 7 रोजी रात्री चोरी केली कार्यालय फोडून चोरट्याने आत प्रवेश केला कार्यालयातील तिजोरी फोडून चोरट्याने 4 किलो 762 ग्रॅम 679 मिली वजनाची सोन्याची दागिने किंमत 2 कोटी 61 लाख 42 हजार रुपये व रोख रक्कम 2 लाख 21 हजाराचा एकूण 2 कोटी 63 लाख 63 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. शनिवार दिनांक 8 रोजी सकाळी ही चोरीची घटना निदर्शनास आली. दिशा नागरी सहकारी पतसंस्थेचा लिपिक राहुल राजेंद्र जाधव (राहणार गवळी गल्ली नळदुर्ग) यांनी त्याचा मित्र सुशील राठोड (राहणार गवळी गल्ली नळदुर्ग) व अन्य दोन जणांच्या मदतीने कट रचून ही चोरी केली शाखेच्या मुख्य शटरचे लॉक चावीने उघडून आत प्रवेश करून आत मधील तिजोरीतील एकूण 263 कर्जदारांची 2 कोटी 61 लाख 42 हजार 27 रुपयांच्या कर्जासाठी तारण ठेवलेले 4 किलो 762 ग्राम 679 मिली वजनाचे सोन्याचे दागिने व रोख 2 लाख 21 हजार 225 रुपये असा एकूण 2 कोटी 63 लाख 63 हजार 272 रुपयाचा मुद्देमाल चोरट्याने लुटून नेला अशी फिर्याद दिशा नागरी पतसंस्थेची शाखा अधिकारी उमेश भानुदास जाधव यांनी नळदृग पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
त्यावरून लिपिक राजेंद्र जाधव यांच्यासह चार जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापैकी राहुल जाधव यास पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक रितु खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री इज्जतपवार हे करत आहेत. लिपिकाच्या विरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यात 2017 मध्ये वाहन चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे त्या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करीत आहेत.
या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तज्ञ ,श्वान पथक , हस्तरेषा ,ठसे नमुने तज्ञ ,पोलीस अधीक्षक पोलीस उपविभागीय अधिकारी ,गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक ,नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षकाने तपास चक्र फिरवली यामुळे अवघ्या 24 तासात आरोपीच्या मुस्क्या आवळण्यात आल्या पोलिसांनी आरोपी लिपिक राहुल जाधव यांच्यासह एकाला अटक केली आहे याप्रकरणी आरोपीच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

0 Comments