मौजे बोरामणी येथे श्री. भावार्थ रामायण ग्रंथास राम भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद-
---------------------------------------------
*गावात ग्रंथ दिंडी काढून किष्किंधाकांडास केली सुरुवात.*
---------------------------------------------
*रामभक्त शकुंतला आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होते राम कथा.*
--------------------------------------------
इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे बोरामनी येथे श्री संत एकनाथ महाराज कृत श्री.भावार्थ रामायण ग्रंथ वाचन निरूपण सेवा मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न होत आहे. दररोज जवळपास दोनशे रामभक्त राम कथेस उपस्थित असतात. बालकांड अयोध्याकांड आणि अरण्यकांड अशा तीन कांडाची सांगता झाली असून किष्किंधा कांडास सोमवार दि.२४ नोव्हेंबर रोजी प्रारंभ करण्यात आला. सोमवारी सकाळी गावात ग्रंथ दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला व सायंकाळी सात वाजता हनुमान मंदिरावर किष्किंधा कांडा स प्रारंभ केला व रात्री ९ ते ११ हभप. शिवाजी महाराज चव्हाण यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. आजच्या या फेसबुक व्हॉट्स ॲप अशा धकाधकीच्या युगात माणूस माणसापासून दूर होतोय एकमेका बद्दलचा जिव्हाळा माया दुरापास्त होत आहे भावाभावाचा स्नेह म्हणावा तसा राहिला नाही म्हणूनच समाजामध्ये आदर निर्माण व्हावा कुटुंबा मध्ये जिव्हाळ्याचे नाते पुन्हा घट्ट व्हावे यासाठी बोरामणी येथील रामभक्त भाविकांनी श्री भावार्थ रामायण ग्रंथास दोन महिन्यापूर्वी सुरुवात केली आणि ग्रामस्थांनी ही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला हनुमान मंदिरावर दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत राम कथा संपन्न होते विशेष म्हणजे न भूतो न भविष्यती अशी राम भक्तांची अलोट उपस्थिती असते.ही रामकथा सुनियोजित पार पाडण्यासाठी रामभक्त हभप. शिवाजी सुरवसे , नरेश येलम , रामभक्त श्रीमती शकुंतला आवटे, दत्ता हंगरगे , सुरेश विभुते, दत्तात्रय शेळके, पंडित पटणे, संजय विभूते यांच्यासह सर्व ग्रामस्थ रामभक्त प्रयत्नशील आहेत.


0 Comments