लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस 20 वर्ष कारावासाची शिक्षा सोलापूर जिल्हा विशेष न्यायालयाचा निकाल-Solapur Court Judgment Sexully Assult Accuse Imprisment

Hot Posts

6/recent/ticker-posts

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस 20 वर्ष कारावासाची शिक्षा सोलापूर जिल्हा विशेष न्यायालयाचा निकाल-Solapur Court Judgment Sexully Assult Accuse Imprisment

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस 20 वर्ष कारावासाची शिक्षा सोलापूर जिल्हा विशेष न्यायालयाचा निकाल- 


सोलापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश डी. एन सुरवसे यांनी आरोपी अंबादास लक्ष्मण गावडे वय (36) (रा. मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर) या आरोपीस 20 वर्षे कठोर कारावास आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

या प्रकरणाची थोडक्यात हकीगत अशी की पीडित मुलगी 3 मे 2020 रोजी घरातून बेपत्ता झाली होती तिचा शोध घेत असताना ती आरोपी अंबादास गावडे यांच्या घरातून बाहेर येताना जातेवेळी नातेवाईकांना दिसली संशय आल्याने मुलींच्या घरच्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली त्यावेळी पीडित मुलींनी आरोपी गावडे यांनी तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशी धमकी दे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली तसेच आरोपीने वारंवार अशी  कृत्य केल्याची ही तिने सांगितले.

या फिर्यादीवरून मंद्रूप पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगूवाले यांनी करून आरोपीस अटक केली आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश सुरवसे यांच्या न्यायालयात झाली. सरकारी वकीलचा युक्तिवाद व साक्षीदारांच्या साक्षी गृह्य धरून आरोपी गावडे यास वीस वर्षे कठोर कारावासाचे शिक्षा ठोठावली या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एडवोकेट शितल डोके व ॲडव्होकेट प्रकाश जन्नु यांनी काम पाहिले तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार जाधव, प्रिया जाधव ,पोलीस शिपाई पूजा काळे, अनिता काळे यांनी कामकाज पाहिले.

Post a Comment

0 Comments