फोनद्वारे वृद्धास दहा लाखाची खंडणीची मागणी, कुटुंबास जिवे मारण्याची धमकी, दोन जनावर गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना- Paranda Police Station Crime News
धाराशिव : आम्ही अडचणीमध्ये आहोत असे म्हणून दोन जणांनी एका 69 वर्षीय वृद्धास वेळोवेळी फोन करून दहा लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याच धक्कादाय घटना परंडा तालुक्यात घडली आहे याप्रकरणी वृद्ध नागरिक दीपक तिवारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन जनाविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी नामे-अमर दयानंद तिवारी, आनंद दयानंद तिवारी, दोघे रा. शिक्षक सोसायटी परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.11.11.2025 रोजी 19.30 वा. सु. सर्वे नं 45 कुर्डवाडी रोड परंडा येथे फिर्यादी नामे- दिपक द्वारकाप्रसाद तिवारी, वय 69 वर्षे, रा. सर्वे सर्वे नं 45 कुर्डवाडी रोड परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी वेळो वेळी फोन करुन आम्ही आार्थिक अडचणीमध्ये आहोत असे म्हणून 10,00,000₹ खंडणी मागुन सदरील रक्कम फिर्यादीने आरोपीस नाही दिल्यास नमुद आरोपींने फिर्यादीचे कुटुंबातील सदस्य मुलगा, मुलगी सुन यांना जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दिपक तिवारी यांनी दि.04.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे परंडा येथे भा.न्या.सं.कलम 33,308(2)(4), 351(2)(4), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास परंडा पोलीस करत आहेत.

0 Comments