धाराशिव: घरी सोडण्याच्या बहाण्याने २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv Crime News Shiradhon Police Station

Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव: घरी सोडण्याच्या बहाण्याने २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv Crime News Shiradhon Police Station

धाराशिव:  घरी सोडण्याच्या बहाण्याने २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार धाराशिव जिल्ह्यातील घटना-


धाराशिव : तालुक्यातील शिराढोण  पोलीस ठाण्याचे हद्दीतील एका गावातील एका तरुणाने २० वर्षीय तरुणीला मोटरसायकल वर बसून तुझे घरी सोडतो असे म्हणून तिच्यावर शेतामध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण  पोलीस ठाण्यात नमूल तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की धाराशिव तालुक्यातील एका गावातील 20 वर्षीय मुलगी दि.15.01.2025रोजी 12.00 वा. सु. हिस एका गावातील एका तरुणाने तुला मोटरसायकलवर तुझे घरी सोडतो असे म्हणून तुर व हरभरा असलेल्या शेतात घेवून जावून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. तु तुझे घरी सांगितले तर तुला जिवे ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.31.12.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64(2)(एफ), 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments