अनैतिक व्यवसायास करण्यासाठी डांबुन ठेवून 25 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल धाराशिव जिल्हातील घटना-Dharashiv Crime News
धाराशिव: धाराशिव तालुक्यातील एका गावातील 25 वर्षीय महिलेस अनैतिक व्यवसाय करण्यासाठी डांबुन ठेवून ग्राहकाकडून पैसे घेऊन पिडीतेस भाग पाडले व त्यातील दोन तरुणांनी पिडीतेचे विरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.ही घटना सन 2022पासुन ३ फेब्रुवारी 2026 पर्यंत घडली. याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून नमूद आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की धाराशिव तालुक्यातील गावातील 25 वर्षीय महिला (नाव- गावगोपनीय) सन 2022 पासून दि.03.02.2026 रोजी पर्यंत हिस एका गावातील 9 महिला व पुरुष आरोपी यांनी जबरदस्तीने अनैतिक व्यावसाय करण्यासाठी डांबुन ठेवुन ग्राहकाकडून पैसे घेवून नमुद पिडीतास भाग पाडले. त्यातील दोन तरुणांनी पिडीतेचे इच्छेविरुध्द वारंवार तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.12.02.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64(2)(एम), 115(2),351(3), 3(5) सह अनैतिक व्यापार अधिनियत कलम 4,5,6 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करत आहेत.

0 Comments