अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू - जळकोट नळदुर्ग रोडवरील घटना नळदृग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदTuljapur -,Jalkot-Naldurg Road Accident

Hot Posts

6/recent/ticker-posts

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू - जळकोट नळदुर्ग रोडवरील घटना नळदृग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदTuljapur -,Jalkot-Naldurg Road Accident

अज्ञात वाहनाच्या धडकेत  पादचाऱ्याचा मृत्यू - जळकोट नळदुर्ग रोडवरील घटना नळदृग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद


तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील 40 वर्षीय पुरुष जळकोट ते नळदृग रोडवर पायी रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली या ते गंभीर जखमी झाले अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली बालाजी काशिनाथ घुगे वय 40 राहणार जळकोट असे मयत व्यक्तीचे नाव आहे .याप्रकरणी त्यांच्या पत्नी मनीषा भोगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदृग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की  मयत नामे-बालाजी काशिनाथ भोगे, वय 40 वर्षे, रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.16.12.2025 रोजी 04.17 वा. सु.जळकोट ते नळदुर्ग रोडवर न्यु शिवनेरी स्टोन डेपो जळकोट येथे पायी  रस्ता ओलांडत होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगयी व निष्काळजीपणे चालवून बालाजी भोगे यांना धडक दिली. या अपघातात बालाजी भोगे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मनिषा बालाजी भोगे, वय 33 वर्षे, रा. जहकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.12.02.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125 (ए), 106 (1) सह 134 (ए), 134(बी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments