कांद्याला भाव नाही- बँका खाजगी फायनान्स चे कर्ज कसे फेडायचे आर्थिक विवेंचनेतून कांदा उत्पादक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - तुळजापूर तालुक्यातील घटना-Tuljapur Police Station FIR

Hot Posts

6/recent/ticker-posts

कांद्याला भाव नाही- बँका खाजगी फायनान्स चे कर्ज कसे फेडायचे आर्थिक विवेंचनेतून कांदा उत्पादक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - तुळजापूर तालुक्यातील घटना-Tuljapur Police Station FIR

कांद्याला भाव नाही- बँका खाजगी फायनान्स चे कर्ज कसे फेडायचे आर्थिक विवेंचनेतून कांदा उत्पादक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - तुळजापूर तालुक्यातील घटना-


धाराशिव : कांद्याला भाव नाही आता बँका खाजगी फायनान्स चे कर्ज कसे फेडायचे या आर्थिक विवेंचनेतून शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील आपशिंगा येथे घडली आहे. आप्पा सोपान पवार (वय 50 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे .ही घटना रविवार, दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ  व्यक्त केली जात आहे या घटनेची तुळजापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शेतातच गळफास; सकाळी उघडकीस आली घटना

अपसिंगा–ढेकरी रस्त्यालगत असलेल्या त्यांच्या स्वतःच्या शेतात, सकाळी दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास साडीच्या साह्याने झाडाला गळफास घेऊन त्यांनी आपले जीवन संपवले. नेहमीप्रमाणे शेताकडे गेले असताना बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता ही धक्कादायक घटना समोर आली. ही बातमी गावात समजतात संपूर्ण अपसिंगा गावात शोककळा  कळा पसरली आहे.

चार एकर कांद्याचे पीक; मात्र कांद्याला कवडीमोल दर

मयत शेतकरी आप्पा पवार यांच्याकडे सुमारे चार एकर शेती असून त्यामध्ये कांद्याचे पीक घेतले होते. मात्र यंदाच्या हंगामात कांद्याला अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. उत्पादन खर्च, मजुरी, खत-बियाणे, औषधे आणि वाहतुकीचा खर्च वाढलेला असताना बाजारात कांद्याला मिळणारा अत्यल्प दर त्यांच्या पाठीवरील कर्जाचा भार अधिकच वाढवणारा ठरला.
बँक व फायनान्स कंपन्यांचे कर्ज; सततचा तगादा
कांद्याच्या उत्पन्नावरच कर्जाचे हप्ते फेडण्याची आशा असलेल्या आप्पा पवार यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले होते. बँक तसेच खासगी फायनान्स कंपन्यांचे कर्ज, त्यावरील वाढते व्याज आणि सततचा तगादा यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
उत्पन्न हातात नसताना कर्जदारांकडून होत असलेला दबाव सहन करणे त्यांच्यासाठी दिवसेंदिवस कठीण होत चालले होते.
.कर्जाचा डोंगर, उत्पन्न शून्य; शेतकरी हातबल
शेतमालाला योग्य भाव न मिळणे, कर्जमाफीची आश्वासने प्रत्यक्षात न उतरने आणि वाढता उत्पादन खर्च — या सगळ्यांच्या विळख्यात अडकलेला शेतकरी अक्षरशः हातबल झाला आहे, हे वास्तव या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. कष्ट करून पिकवलेला माल बाजारात कवडीमोल भावात विकावा लागतो, तर दुसरीकडे कर्जाची जबाबदारी मात्र कायम राहते, ही शेतकऱ्यांची वेदना या आत्महत्येच्या घटनेतून ठळकपणे दिसून येते.

पोलीस पथक घटनास्थळी दाखल पंचनामा तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच बीट आमलदार चौधरी व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर मृत्यूबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी सविस्तर पंचनामा सुरू असून, मृत शेतकऱ्यावर कोणत्या बँक व कोणत्या फायनान्स संस्थांचे कर्ज होते, कर्जाची एकूण रक्कम किती होती, तगाद्याचा प्रकार काय होता, याबाबत सखोल तपास केला जात आहे. याप्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आपसिंगा  गावावर शोककळा

या हृदयद्रावक घटनेमुळे अपसिंगा गावासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. गावकऱ्यांनी आप्पा पवार यांच्या कुटुंबीयांना धीर देत शासकीय मदतीची तात्काळ गरज व्यक्त केली आहे.“शेतमालाला योग्य भाव कधी मिळणार? कर्जमाफी कधी होणार? शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या ठोस योजना प्रत्यक्षात कधी उतरवणार?” असे प्रश्न संतप्त ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत.
शासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या घटना पाहता, शासनाने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणीसह ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
शेतमालाला हमीभाव, कर्जमाफी, उत्पादन खर्चाला पूरक दर आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी आधार योजना तातडीने राबवाव्यात, अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments