धाराशिव : स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांची कारवाई; गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक उघड-Local Crime Branch Dharashiv, cattle transport case Osmanabad
धाराशिव | प्रतिनिधी : गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक ( illegal cattle transport news ) करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10.10 वाजता पोलीस ठाणे वाशी हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार हे पथकासह पारा येथून फकराबादकडे जाणाऱ्या मार्गावर गस्त घालत असताना संशयित वाहन दिसून आले. सदर वाहनात गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी चालकास गाडी थांबविण्याचा इशारा दिला.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये चार गोवंशीय जनावरे अत्यंत दाटीवाटीने भरलेली आढळून आली. जनावरांना हालचालीसाठी पुरेशी जागा नव्हती व त्यांची अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. चालकाकडे जनावरे कोठून आणली व कशासाठी नेत आहात, याबाबत चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
यानंतर वाहन पोलीस ठाणे वाशी येथे आणून दोन पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. वाहनासह जनावरांची एकूण अंदाजे किंमत ₹8,80,000/- इतकी असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी गुन्हा नोंद क्रमांक 54/2026 अन्वये खालील कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, 1960 कलम 11 (1) (D) (E) (H)
-
महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, 1995 कलम 5(अ) (1), 9
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बळीराम यादव, पोलीस स्टेशन वाशी करीत आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस हवालदार दयानंद गादेकर, बळीराम शिंदे, पोलीस अंमलदार पुष्कर मुगळे, पोलीस हवालदार सुभाष चौरे तसेच पोलीस स्टेशन वाशीचे पोलीस हवालदार बळीराम यादव यांचा सहभाग होता.


0 Comments