तुळजापूर:“हॉर्न परत का दिला नाही?” या कारणावरून कुंभारी येथे तरुणावर दगड-काठ्यांनी हल्ला; सात जणांवर गुन्हा दाखल-Tuljapur Crime News Balaghatnewstimes
धाराशिव (प्रतिनिधी): तालुक्यातील कुंभारी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणावर लाथाबुक्यांनी, दगड व काठीने मारहाण करण्यात आल्याची घटना १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाणे येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी समर्थ बाळसाहेब वडणे (वय २०, रा. कुंभारी ता. तुळजापूर जि. धाराशिव) यांनी दिलेल्या प्रथम खबरेनुसार, १७ फेब्रुवारी रोजी सायं. ७.०० ते ७.३० वाजण्याच्या सुमारास मांजरा शुगर फॅक्टरी परिसरातील त्यांच्या घरासमोर आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून “हॉर्न परत का दिला नाही?” या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी तसेच दगड व काठीने मारहाण करून जखमी केले.
यावेळी फिर्यादीचे चुलते व आजी यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी आरोपी ओम तांबे, चंद्रकांत तांबे, पवन तांबे, प्रतीक तांबे, अक्षय तांबे, सुरज तांबे व राज तांबे (सर्व रा. कुंभारी ता. तुळजापूर जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 189(1), 189(2), 190, 191(1), 191(2), 191(3) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास तुळजापूर पोलिसांकडून सुरू आहे.

0 Comments