शेतात नेऊन महिलेवर लैंगिक अत्याचार; बंदुकीचा धाक दाखवून धमकी तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना-Tamalwadi Police Station Crime
धाराशिव : तामलवाडी पोलीस ठाणे हद्द परिसरात धक्कादायक घटना दिनांक 27 रोजी उघडकीस आली असून 32 वर्षीय महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित तरुणाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. वारंवार तामलवाडी पोलीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनांमुळे महिला सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घटना कशी घडली?
दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी पीडिता पायी चालत तुळजापूर कडे जात असताना गावातील एका तरुणाने “तुला तुळजापूर येथे सोडतो” असे सांगून मोटरसायकलवर बसवले. त्यानंतर आरोपीने तिला गावाबाहेरील शेतात, ज्वारीच्या पिकामध्ये नेले. तेथे बंदुकीचा धाक दाखवून, तोंड दाबून जिवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत पीडितेने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
गुन्हा दाखल
पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. कलम 64(1), 351(2), 351(3) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 3(2)(व्ही), 3(2)(व्हीए) आणि शस्त्र अधिनियम कलम 3, 25 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे, गुन्हा दाखल, पोलिस तपास करीत आहे.

0 Comments