🔴 लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून 4.40 लाखांची फसवणूक; भुम तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस -Bhum Crime News Live

Hot Posts

6/recent/ticker-posts

🔴 लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून 4.40 लाखांची फसवणूक; भुम तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस -Bhum Crime News Live

 लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची 4.40 लाखांची फसवणूक; भुम तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस -Bhum Crime News Live 


धाराशिव  : लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा धक्कादायक प्रकार भुम तालुक्यात उघडकीस आला आहे. दिंडोरी येथील महेश दादासाहेब गपाट (वय 29) यांना आरोपींनी लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 4 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 1 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास धाराशिव येथील बसस्थानकासमोर आरोपी नझमा महाबरी राजु, लक्ष्मी धनाजी तुपे व दोन अनोळखी इसम यांनी फिर्यादी महेश गपाट यांच्या कुटुंबीयांकडून लग्न लावून देण्याच्या बहाण्याने 4 लाख रुपये रोख तसेच 40 हजार रुपये ऑनलाईन स्वरूपात उकळले. त्यानंतर संबंधितांनी विश्वासात घेऊन बनावट पद्धतीने लग्नाची प्रक्रिया पूर्ण केल्याचे भासवले.

यानंतर फिर्यादीच्या वडिलांनी संबंधित मुलगी लक्ष्मी हिला तिच्या बहिणीकडे सोडण्यासाठी गेल्यानंतर दोन अनोळखी इसमांनी धक्कादायक खुलासा करत “हा आमचा धंदा आहे, मुलगी दाखवून लग्न लावतो आणि पैसे घेऊन पळून जातो” असे सांगत धमकी दिली. तसेच पुन्हा चौकशी केल्यास जीव घेण्याची धमकी देत त्यांना तेथून हाकलून लावण्यात आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी महेश गपाट यांनी दिनांक 23 मार्च 2026 रोजी भुम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 352, 351, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.


Post a Comment

0 Comments