धाराशिव : बांधाच्या वादातून जीवघेणा हल्ला; दोघांविरोधात गुन्हा दाखल-Dharashiv Crime News Live Update
धाराशिव | प्रतिनिधी : वाशी तालुक्यातील पारा येथील बांधाच्या वादातून एकाला जीवघेणा मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र बाबुराव भराटे आणि बाबुराव सोपान भराटे (दोघे रा. पारा, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी दि. 28 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5.15 वाजण्याच्या सुमारास सारोळा जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडवली.
फिर्यादी धनंजय दत्तात्रय भराटे (वय 46, रा. पारा, ता. वाशी, जि. धाराशिव) हे सचिन भराटे यांच्या पत्र्याच्या शेडच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर असताना, “बांध काढल्या बद्दल का बोलतोस” या कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी तसेच कुऱ्हाडीने मारहाण केली. या हल्ल्यात धनंजय भराटे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर जखमी धनंजय भराटे यांनी दि. 29 मार्च 2026 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून वाशी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम 109, 115(2), 351(2), 351(3), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक तपास करीत असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

0 Comments