अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल- धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv Crime News Update
धाराशिव : शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १७ वर्षीय मुलीला (नाव व गाव गोपनीय) ओळखीतील एका तरुणाने फसवून लॉजवर नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेदरम्यान आरोपीने पीडित मुलीला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ही घटना ११ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात असून, पीडित मुलीने धैर्य दाखवत ६ मार्च २०२६ रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी Bharatiya Nyaya Sanhita मधील कलम 64(2), 115(2), 351(2), 352, 3(5) तसेच Protection of Children from Sexual Offences Act (पोक्सो) कायद्यांतर्गत कलम 4, 6, 8 व 17 नुसार गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा पुढील तपास शिराढोण पोलीस करत आहे.

0 Comments