शासकीय कामात अडथळा; पवनचक्की कामगारांवर हल्ला – तिघांविरुद्ध गुन्हा दाखल तुळजापूर तालुक्यातील घटना-Naldurg Crime News Update

Hot Posts

6/recent/ticker-posts

शासकीय कामात अडथळा; पवनचक्की कामगारांवर हल्ला – तिघांविरुद्ध गुन्हा दाखल तुळजापूर तालुक्यातील घटना-Naldurg Crime News Update

शासकीय कामात अडथळा; पवनचक्की कामगारांवर हल्ला – तिघांविरुद्ध गुन्हा दाखल तुळजापूर तालुक्यातील घटना-Naldurg Crime News Update 


तुळजापूर (धाराशिव) – तुळजापूर तालुक्यातील गंधोरा शिवारात सुरू असलेल्या पवनचक्की प्रकल्पाच्या कामादरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करून कामगारांवर हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 16 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास गंधोरा शिवारातील शेत गट क्रमांक 284 व 285 येथे पवनचक्की प्रकल्पासाठी तारा ओढण्याचे काम सुरू होते. यावेळी फिर्यादी शंकर पुंडलिक कांबळे (वय 37), नेमणूक पोलीस ठाणे नळदुर्ग, तसेच इतर शासकीय कर्मचारी आपले कर्तव्य बजावत होते.

दरम्यान, आरोपी रुक्मिणी कल्लाप्पा राठोड (रा. गंधोरा तांडा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) तसेच रेणुका राजेश राठोड व राजेश राठोड (दोघे रा. खोपोली, ता. खोपोली, जि. रायगड) यांनी घटनास्थळी येऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यांनी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदार तुळजापूर यांच्या आदेशाचे उल्लंघन करत कामगारांना शिवीगाळ केली.

तसेच आरोपींनी दगडफेक करून व तारांनी मारहाण करत कामगारांना जखमी केले. या प्रकारामुळे कामात मोठा अडथळा निर्माण झाला आणि परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेप्रकरणी फिर्यादी शंकर कांबळे यांनी दि. 17 मार्च 2026 रोजी दिलेल्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 132, 125, 223, 118(1), 115(2), 352 व 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments