लोहारा : जेवळी बसवरत्न पुरस्कार 2026 नामांकन जाहीर; सहा मान्यवरांचा होणार सन्मान-Jevali Basavrata
धाराशिव | प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील मौजे जेवळी येथे महात्मा बसवेश्वर यात्रा कमिटी यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठित “जेवळी बसवरत्न पुरस्कार – उत्सव गुणरत्नांचा, सन्मान कर्तृत्वाचा” या पुरस्काराचे सन 2026 साठी नामांकन जाहीर करण्यात आले आहे. सामाजिक एकोपा, आधुनिक विचारसरणी आणि सर्व धर्मीयांमध्ये सलोखा वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम गावात विशेष आकर्षण ठरत आहे.
सन 2024 पासून सुरू झालेल्या या अभिनव उपक्रमाने अल्पावधीतच गावात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जेवळी उत्तर येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वर यांच्या यात्रेनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.
यंदाचा पुरस्कार सोहळा दि. 21 एप्रिल 2026, मंगळवार रोजी रात्री 9 वाजता, बसवमंच, बाजारपेठ जेवळी येथे पार पडणार असून, मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव केला जाणार आहे.
गावाच्या प्रगतीसाठी योगदान देणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे आणि आपल्या कार्यातून गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराद्वारे प्रोत्साहन दिले जाते. “मानवता हाच धर्म” या महात्मा बसवेश्वरांच्या विचारधारेनुसार सर्व जाती-धर्मातील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.
यावर्षी खालील सहा मान्यवरांची निवड करण्यात आली आहे:
🏅 जेवळी बसवरत्न पुरस्कार 2026 मानकरी:
- संतोष उपासे – संशोधन विभाग
- सुनिल देशपांडे – आदर्श व्यक्तिमत्व
- मल्लिनाथ सोळसे – आदर्श शिक्षक
- बाबा राठोड – पोलिस दलातील अतुलनीय कामगिरी
- पांडू होनाजे – आदर्श शेतकरी
- विशाल होनाजे – आदर्श शेतकरी
या निवडीबद्दल गावकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण असून, सामाजिक एकोपा व परंपरेची परंपरा कायम ठेवत हा उपक्रम अधिक भव्य स्वरूपात पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

0 Comments