मौजे बोरामणी येथे सोमवार दि.२० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा होणार संपन्न.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*वाचक व सुचकानी निरपेक्ष सेवा बजावून सहकार्य करावे.*
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे बोरामणी येथे सोमवार दि.२० एप्रिल २०२६ रोजी श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार असुन या सोहळ्यास गाव परिसरातील वाचक सूचक व राम भक्तांनी उपस्थित राहून राम कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन रामभक्त ग्रामस्थांच्या वतीने प्रसिध्दी पत्रकान्वये केलेले आहे. प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी मौजे बोरामणी येथील लाल हनुमान मंदीरात श्री संत एकनाथ महाराज लिखित श्री भावार्थ रामायण ग्रंथ मोठ्या उत्साहात सुरू असुन युद्धकांडा तील श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा ग्रंथ वाचन निरूपण सेवेस सोमवार दि. २० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता सुरुवात करण्यात येणार असून मंगळवार दि.२१ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता श्री लक्ष्मण सावचित्त झाल्यानंतर वाचन निरूपण सेवेची सांगता होईल.या श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळ्यात एकूण सात अध्याय व ११३५ ओव्याचे वाचन निरूपण रात्रभर होणार असून तब्बल १२ तास हा सोहळा चालणार आहे.वाचन निरूपण सांगते नंतर महाआरती करून महाप्रसादाचे वाटत करण्यात येणार आहे. तरी गाव परिसरातील वाचक सूचक व राम भक्तांनी निरपेक्ष सेवाभावाने सहकार्य करून या धार्मिक सोहळ्यातील राम कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन रामभक्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे.*

0 Comments