पतीच्या प्रेयसीला अडकवण्यासाठी अपहरणाचा बनाव करून सख्या चुलतीने केला पुतण्याचा गळा दाबून निर्गुण खून- लातूर जिल्ह्यातील घटना-Latur Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

पतीच्या प्रेयसीला अडकवण्यासाठी अपहरणाचा बनाव करून सख्या चुलतीने केला पुतण्याचा गळा दाबून निर्गुण खून- लातूर जिल्ह्यातील घटना-Latur Crime News

पतीच्या प्रेयसीला अडकवण्यासाठी अपहरणाचा बनाव करून सख्या चुलतीने केला पुतण्याचा गळा दाबून  निर्गुण खून- लातूर जिल्ह्यातील घटना-Latur Crime News 

मयत देवांश स्वामी व आरोपी अनिता स्वामी

लातुर-प्रतिनिधी:  लातूरच्या चाकूरमधील ७ वर्षांच्या देवांश स्वामीच्या खुनाबद्दलची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पतीच्या प्रेयसीला अडकवण्यासाठी सख्या चुलतीनेच पुतण्याचा गळा दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी महिला अनिता स्वामीला अटक केली आहे. ही घटना 19 एप्रिल रोजी उघडकीस आली आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आरोपीच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते त्यावरून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत असत यामुळे स्वतः सहदिराच्या मुलांचे अपहरण झाल्याचा बनाव करून तो आरोप पतीच्या प्रियशीवर लावून तिला अडकवण्यासाठी सात वर्षीय पुतण्याचा खून करण्यात आला.गुन्हा लपवण्याच्या उद्देशाने मृतदेह पडक्या वाड्यात टाकून दिला अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली या धक्कादायक माहितीने खून प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे आरोपी महिलेला न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

लातूर जिल्ह्यातील चाकूर सह जिल्हाभरात खळबळ उडवणाऱ्या चाकूर येथील सात वर्षे पत्नीच्या खून प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांची येथील उपविभागीय पोलीस कार्यालयात पत्रकार परिषद झाली यावेळी ते म्हणाले रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी साईचरण दिनेश स्वामी वय() व देवांश मंगेश स्वामी वय सात हे दोघे सखी चुलत भाऊ सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातून खेळण्यासाठी बाहेर गेले होते ते परत न आल्याची माहिती फिर्यादी मंगेश चंद्रकांत स्वामी यांनी परिसरांना दिली यावरून पोलीस व नागरिकांनी संयुक्त परिसरात सुरू केला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास महादेव मंदिराजवळील उजळम रोड परिसरातील नरेंद्र शेटे यांच्या जुन्या घराजवळील मोकळ्या जागेत ट्रॅक्टरच्या टायरचे आडोशाला देवांश स्वामी याचा मृतदेह आढळून आला.

पोलीस निरीक्षक बालाजी भंडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला घटनास्थळी श्वान पथक फॉरेन्सिक टीम आणि ठसे तज्ञांचा पाचारण करण्यात आले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास संदर्भात सूचना दिल्या अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा व चाकूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांनी सर्व अंगाने वेगाने तपास सुरू केला फिर्यादीची वहिनी आणि अनिता दिनेश स्वामी हिचे वर्तन संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले .या घटनेनंतर तिचा मोबाईल बंद असणे व साधारणता दोन अडीच तास ती घराबाहेर असणे व चौकशी दरम्यान विसंगत माहिती देणे यामुळे पोलिसांच्या वर लक्ष केंद्रित केले पोलिसांनी चौकशी केली असता परिस्थिती जन्य पुरावे व तांत्रिक माहितीची सांगड घातली. त्यावेळी आरोपी अनिता स्वामी हिने गुन्ह्याची कबुली दिली.

प्राथमिक तपासात आरोपी अनिता स्वामी हिच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते दोन वर्षांपूर्वी त्यांची भांडणही झाली होती याच कारणावरून अनिता व तिच्या पतीत नेहमी खटके उडत होते यामुळे स्वतःसह दिराच्या मुलाचा अपहरणाचा बनाव रचला तिने दिराचा मुलगा देवांश मंगेश स्वामी यांचा खुन करून त्याचा आरोप पतीच्या प्रियशीवर टाकून तिला अडकवण्यासाठी कट रचला. यातूनच अनिताने निर्दोष बालकाचा खून केला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे; आरोपी अनिता स्वामी हिला सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती मंगेश चव्हाण यांनी दिली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी पोलीस निरीक्षक बालाजी भंडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments