लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे अत्याचार; विरोध केल्यावर मारहाण व जीवे मारण्याची धमकी-धाराशिव जिल्ह्यातील घटना -Dharashiv Crime
धाराशिव : प्रतिनिधी
आनंदनगर पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, लग्नाचे आमिष दाखवून एका 29 वर्षीय तरुणीवर जवळपास दोन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित तरुणी (नाव व गाव गोपनीय) हिला गावातील एका तरुणाने लग्नाचे आश्वासन देत दि. 14 जून 2024 ते 16 मार्च 2026 या कालावधीत वेळोवेळी लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान, पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने तिच्यावर शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच, पुन्हा लग्नाचा विषय काढल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेने मानसिक व शारीरिक त्रास सहन केलेल्या पीडितेने अखेर दि. 21 एप्रिल 2026 रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 64, 115(2), 351(2), 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
सदर प्रकरणाचा अधिक तपास आनंदनगर पोलीस करत असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

0 Comments