विहिरीत ढकलून वृद्ध महिलेचा खून; भुम तालुक्यातील थरारक घटना, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल-Murder Crime News Bhum Dharashiv District
धाराशिव/ प्रतिनिधी : भुम तालुक्यातील निपाणी शिवारात एका 60 वर्षीय वृद्ध महिलेचा विहिरीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत राम महाकले (रा. लांजेश्वर ता. भुम) आणि गणेश राजेंद्र गिरी (रा. आंद्रुड ता. भुम) यांनी दि. 21 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 12.30 ते सकाळी 8.00 वाजण्याच्या दरम्यान निपाणी शिवारातील विहिरीजवळ ही घटना घडवली.
मयत बदामबाई सुर्यभान गिते (वय 60, रा. आंद्रुड ता. भुम) यांना अज्ञात कारणावरून आरोपींनी जबरदस्तीने विहिरीत ढकलून दिले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी मयत महिलेचे नातेवाईक सुर्यभान एकनाथ गिते (वय 70) यांनी दि. 22 एप्रिल रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपींना अटक करण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.या हत्येमागे कौटुंबिक वाद, वैयक्तिक द्वेष की अन्य कोणते कारण आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

0 Comments