हभप.अशोकराव जाधव गुरूजी
बाभळगावकर म्हणजे सर्व सामान्यांचा आधारच.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे बाभळगाव येथील सुपुत्र तथा प्रसिद्ध प्रवचनकार हभप.अशोकराव जाधव गुरूजी म्हणजे सर्व सामान्यांचा आधारच ११ मे हा अशोक जाधव गुरूजी यांचा जन्म दिवस त्या निमित्ताने त्यांच्या जीवन कार्याविषयी लिहलेला हा छोटासा लेख.माणूसपण जपणाऱ्या व्यक्तीमत्वाचा हा जन्म दिवस
गुरुवर्य हभप.अशोकराव जाधव गुरूजी यांना या मंगल दिनानिमित्त मनःपूर्वक लाख लाख शुभेच्छा!....
प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत, संघर्षाच्या आगीत स्वतःला तावून-सुलाखून आपण आयुष्य घडवलंत. सरस्वतीची अखंड उपासना करत ज्ञानाचा दीप प्रज्वलित ठेवला. आयुष्याच्या प्रवासात लक्ष्मीला यायला उशीर झाला, पण आपल्या जिद्दीने, प्रामाणिकपणाने आणि अथक परिश्रमाने आपण यशाचे सर्वोच्च शिखर गाठले. आज सरस्वती आणि लक्ष्मी दोघीही आपल्या कर्तृत्वाच्या अंगणात हातात हात घालून नांदत आहेत, याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान वाटतो.आपण एक अष्टपैलू, बहुआयामी आणि आदर्श व्यक्तिमत्त्व आहात. शिक्षक म्हणून सुरू झालेला आपला प्रवास आदर्श मुख्याध्यापक पदापर्यंत पोहोचला आणि या संपूर्ण वाटचालीत आपण शिक्षण क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य आजही प्रेरणादायी ठरत आहे. प्रयोगशील शिक्षक, उपक्रमशील मुख्याध्यापक प्रवचनकार किर्तनकार आणि विद्यार्थीप्रिय गुरुजी म्हणून आपण निर्माण केलेली ओळख ही असंख्य विद्यार्थ्यांच्या व तमाम मनुष्य प्राण्यांच्या आयुष्याला दिशा देणारी आहे.विद्यार्थ्यांच्या समस्या असोत, शिक्षकांचे प्रश्न असोत, आपण आपल्या शिक्षक संघटनेच्या माध्यमातून सातत्याने न्यायासाठी आवाज उठवला. आपल्या कार्याचा गौरव महाराष्ट्राच्या शिक्षण विभागापर्यंत पोहोचला, हे आपल्या नेतृत्वाचे आणि कार्यकर्तृत्वाचे जिवंत उदाहरण आहे.आपण केवळ शिक्षक नाही, तर एक क्षण प्रतिभावान लेखक, साहित्यिक, शेरोशायरीकार, प्रवचनकार, किर्तनकार आणि समाजसेवक आहात. आपल्या शब्दांत विचारांची ताकद आहे आणि आपल्या कृतीत माणुसकीचा सुगंध आहे. अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आपण आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला आहे.
सेवानिवृत्तीनंतरही आपण विश्रांती न घेता आध्यात्मिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यात स्वतःला झोकून दिलंत. समाजप्रबोधनाच्या या कार्यात आपण घेतलेली उंच भरारी पाहून आम्हाला मनस्वी आनंद आणि अभिमान वाटतो.गाव परिसराशी आणि मातीतल्या संस्कारांशी असलेली आपली नाळ अत्यंत घट्ट आहे. तंटामुक्त समिती असो, गाव विकासाची चळवळ असो किंवा गावातील कोणताही सार्वजनिक उपक्रम असो जाधव गुरूजी नेहमी हिरिरीने सहभागी होतात. समाजहितासाठी झटणारा आपला स्वभाव हा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.सर,तुम्ही आमचे आदर्श आहात , समतेचा अखंड नंदादीप आहात,अन्यायावर प्रहार करणारा घन आहात,तळपणारा सूर्य आहात,तळागाळाचा वेध घेणारा शार्क आहात,डरकाळी फोडणारा ढाण्या वाघ आहात,आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही माणुसकी जपणारे खरे महान व्यक्तिमत्त्व आहात!आपल्या वाढदिवसानिमित्त आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि अखंड समाजसेवेची ऊर्जा लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
इटकळ ग्रामस्थ व सलगरे परिवाराच्या वतीने आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक राममय शुभेच्छा!
-------------------------------------
पत्रकार दिनेश सलगरे
इटकळ ता. तुळजापूर

0 Comments