मौजे धनगरवाडी येथील शेतकरी कन्या कुमारी संस्कृती खंडू घोडके हिने शालांत परीक्षेत मिळवले १००% गुण.

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे धनगरवाडी येथील शेतकरी कन्या कुमारी संस्कृती खंडू घोडके हिने शालांत परीक्षेत मिळवले १००% गुण.

मौजे धनगरवाडी येथील शेतकरी कन्या कुमारी संस्कृती खंडू घोडके हिने शालांत परीक्षेत मिळवले १००% गुण.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):-  तुळजापुर तालुक्यातील मौजे धनगरवाडी येथील शेतकरी कन्या कुमारी संस्कृती खंडू घोडके हिने शालांत परीक्षेत १००% गुण मिळवत उज्वल यश संपादन केल्या बद्दल गाव परिसरातून कौतुक केले जात आहे.नुकताच शालांत परीक्षा निकाल जाहीर झाला आणि जवाहर विद्यालय अणदूर येथे इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेल्या संस्कृती खंडू घोडके हिने शालांत परीक्षेत १००% गुण मिळवत यश संपादन केले संस्कृतीचे वडील खंडू घोडके हे शेती व्यवसाय करतात तर आई ही पण घरकाम करीत शेती व्यवसायात मदत करते मुलगी चांगल्या गुणांनी पास व्हावी ही वडिलांची इच्छा होती ती संस्कृतीने पूर्ण केली.ग्रामीण भागातील मुल मुली ही उज्वल यश संपादन करू शकतात हेच संस्कृतीच्या निकाला वरून दिसून येते. संस्कृती खंडू घोडके हिने मिळवलेल्या या यशा बद्दल गाव परिसरातून कौतुक करीत अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments