चिवरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा आजी- माजी सैनिक संघटनेतर्फे सत्कार-Chivari Breaking News- Update
चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे शालांत परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थीचा, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश प्राप्त केलेले तसेच आर्थिक दुर्बल परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा येथील आजी-माजी सैनिक संघटना यांच्याकडून दिनांक 16 रोजी सत्कार करण्यात आला. यामध्ये दत्तू अण्णा पाटील माध्यमिक विद्यालयातील एन एम एम एस परीक्षेतील यश संपादन केलेले विद्यार्थी यामध्ये माधुरी मारुती सुतार, आर्या सुरेश कोरे शामल धनाजी शिंदे, राजरत्न मारुती मेंढापुरे, राजवीर गणेश बायस, त्याचबरोबर स्कॉलरशिप परीक्षा सन 2025- 26 मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी यामध्ये माधुरी मारुती सुतार प्रणव नागेश बनसोडे, तसेच नवोदय परीक्षेमध्ये यश संपादन विद्यार्थिनी भाग्यश्री मनमंतबिराजदार, तसेच पुणे येथील आर्मी पब्लिक स्कूल मधील इयत्ता दहावी मधील विद्यार्थी (सीबीसी पॅटर्न) अनुष्का अंकुश कोरे, तसेच यंदाच्या शालांत परीक्षेत विद्यालयातून प्रथम क्रमांक कु. सृष्टी गोपाळ शिंदे, द्वितीय क्रमांक कु. स्वाती सुनिल मिटकरी तर तृतीय क्रमांक कु. सानिका यशवंत झिंगरे या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सैनिक धनराज झांबरे,सैनिक फेडरेशन तुळजापूर तालुका उपाध्यक्ष संभाजी काळजाते, विठ्ठल होगाडे, विष्णू परीट, प्रभाकर बिराजदार, प्रभाकर भुजबळ, हरिदास बिराजदार, गोविंद बिराजदार, प्रवीण शिंदे, नारायण काळे, तसेच सैन्य दलामध्ये सेवा बजावत असलेले जवान प्रवीण शिंदे, अंकुश गोरे आदींसह गावातील महिला तरुण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments