मौजे धनगरवाडी येथील श्री.चैतन्य प्रासादिक दिंडीचे ५ जुलै रोजी देहू कडे प्रस्थान-Itkal Live News Daily
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- सालाबादप्रमाणे याही वर्षी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आषाढी वारी २०२६ साठी देहू ते पंढरपुर आषाढी वारी पायी सोहळ्यासाठी धनगरवाडी ता. तुळजापूर येथून श्री चैतन्य प्रासादिक दिंडी सोहळा दिंडी क्र. (३६४) दिनांक ०५/०७/२०२६ रविवार रोजी सकाळी ठीक १०: ०० वा. सर्व वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थितीत हनुमान मंदिर येथून निघणार आहे.
मौजे धनगरवाडी येथे होणाऱ्या दिंडी प्रस्थान कार्यक्रमासाठी सांप्रदायिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक तसेच अनेक जेष्ठ श्रेष्ठ भाविक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असुन मान्यवरांच्या हस्ते पूजन व आरती होणार आहे.
या दिंडी सोहळ्यात प्रामुख्याने धनगरवाडी, अणदूर, खुदावाडी, सराटी, शिरगापुर, चव्हाणवाडी, इटकळ, तांदुळवाडी, बाभळगाव, बसवंतवाडी, गुबाळ, जळकोटवाडी, नळदुर्ग, आरबळी, जळकोट, घंदोरा, हंगरगा नळ, मानमोडी, केशेगाव, वागदरी, बोरगाव तुपाचे, उदतपुर आदी गावातील भाविक दिंडीत गेल्या नऊ वर्षा पासून सहभागी होत असतात. सर्व भाविकांच्या सहभागामुळे व सर्वांच्या सहकार्याने दिंडीचे यंदा हे 10 वे वर्ष असुन दिंडीचे नियोजन व व्यवस्था उत्तम असुन पारमार्थिक उर्जा देणारा हा सोहळा आहे, असे सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांनी आपली प्रतिक्रिया दिली.
दिंडीत सभागी होण्याचे व प्रस्थान कार्यक्रमासाठी सर्व भाविकांनी उपस्थित असावे अशी आग्रहाची विनंती तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आव्हान दिंडीचे संचालक ह. भ. प. दिपक महाराज निकम व ह. भ. प. बळीराम महाराज सुरवसे यांनी केले आहे.

0 Comments