श्री स्वामी समर्थ डेअरीच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना - आ. सुभाष बापू देशमुख
====================
मौजे इटकळ येथे श्री स्वामी समर्थ डेअरी व दुग्धालयाचे थाटात उद्घाटन
====================
इटकळ (दिनेश सलगरे):- ग्रामीण भागातील तरुणांना उद्योग व्यवसायाची प्रेरणा मिळावी आणि स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म व दुग्धालयाचे भव्य उद्घाटन मा. सुभाष बापू देशमुख (आमदार, दक्षिण सोलापूर) यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी (अध्यक्ष, कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान), सौ. संगीता चनशेट्टी (सचिवा, कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान), प्रा. अनिकेत चनशेट्टी (उपाध्यक्ष, कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान), नेहा चनशेट्टी (सहसचिवा, कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान), माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव वडगावे, माजी जिल्हा परिषद सदस्य अझर मुजावर, शहापूर जिल्हा परिषद सदस्य, बोरामणी जिल्हा परिषद गटाचे नेते नेताजी भाऊ खंडागळे, इटकळचे उपसरपंच फिरोज मुजावर, प्रा. संगमेश्वर जळकोटे, नागनाथ जळकोटे, श्रीशैल जळकोटे, उमाकांत जेऊरे, नागनाथ विभुते, गौरीशंकर जेऊरे, प्रभुलिंग जेऊरे यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्घाटनानंतर मान्यवरांनी खानापूर येथील जळकोटे परिवाराच्या श्री स्वामी समर्थ गोठ्यास भेट देऊन पाहणी केली. यावेळी डेअरी व्यवसायातील संधी, ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये दुग्धव्यवसायाचे महत्त्व तसेच आधुनिक पद्धतीने व्यवसाय उभारणीबाबत सुभाष देशमुख यांनी मार्गदर्शन केले.ग्रामीण भागातील युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे उद्योग-व्यवसाय उभारावेत, या हेतूने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे संचालक मल्लिनाथ जळकोटे व त्यांच्या परिवाराचे मा. सुभाष बापू देशमुख यांनी तोंडभरून कौतुक केले तर अशा उपक्रमांमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळून ग्रामीण भागाच्या विकासाला हातभार लागेल, असा विश्वास प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांनी व्यक्त केला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, हितचिंतक आणि नागरिकांचे जळकोटे परिवाराच्या वतीने आभार मानण्यात आले.

0 Comments