चिवरी येथील ज्येष्ठ नागरिक कौशल्या उदयसिंह बायस यांचे निधन
चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ज्येष्ठ नागरिक कौशल्या उदयसिंह बायस (वय ७१) यांचे दि. १६ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने चिवरीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी चिवरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कौशल्या बायस यांच्या निधनाने बायस परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या जाण्याने कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.

0 Comments