/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज अन् धोकादायक आरास; विनापरवाना तलवार बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे

Hot Posts

डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज अन् धोकादायक आरास; विनापरवाना तलवार बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे

डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज अन् धोकादायक आरास; विनापरवाना तलवार बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे

गणेशोत्सव मिरवणुकीतील नियमांचे उल्लंघन; नळदुर्ग पोलिसांची कारवाई

नळदुर्ग : गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान डॉल्बी साउंड सिस्टीमचा आवाज निर्धारित ध्वनी तीव्रतेपेक्षा अधिक व कर्णकर्कश ठेवल्याबरोबरच वाहनावर नियमबाह्य पद्धतीने उंच व रुंद आरास उभारून सार्वजनिक रहदारी तसेच वीज तारांना धोका निर्माण केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी दोघांविरुद्ध स्वतंत्र दोन गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी एका आरोपीकडून विनापरवाना धारदार तलवारही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

निसर्ग बाळासाहेब बोबडे आणि अमोल नागनाथ पारवे, दोघेही रा. बसवंतवाडी, तुळजापूर, जि. धाराशिव, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 23 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेच्या सुमारास गणेशोत्सवाची मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीमध्ये लावण्यात आलेली वाद्ये पारंपरिक पद्धतीने अथवा पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार न लावता वाहनावर क्षमतेपेक्षा अधिक रुंदी व उंचीची आरास करण्यात आली होती.

ही आरास सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण करणारी तसेच रस्त्यावरील वीज तारांना लागण्याची शक्यता असलेली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे गणेशमूर्तीचेही नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती, असा आरोप पोलिसांनी नोंदविला आहे.

याशिवाय मिरवणुकीतील डॉल्बी साउंड सिस्टीमचा आवाज निर्धारित ध्वनी तीव्रतेपेक्षा अधिक ठेवून कर्णकर्कश पद्धतीने वाजविण्यात आल्याने ध्वनी प्रदूषणासंदर्भातील आदेशांचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

दरम्यान, संबंधित टेम्पोची तपासणी केली असता आरोपी निसर्ग बाळासाहेब बोबडे याच्या ताब्यात विनापरवाना धारदार तलवार आढळून आल्याचेही पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 223, 281, 285, 289, 292, 293, कलम 3 व 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम, ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 मधील कलम 3, 4, 5, 6, शस्त्र अधिनियम कलम 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषण, वाहतूक व सार्वजनिक सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>