Hot Posts

6/recent/ticker-posts

आ. कैलास पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंब्यासाठी तुळजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग तामलवाडी येथे रास्ता रोको आंदोलन


तुळजापुर /बालाघाट न्युज टाइम्स :  धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप २०२० चा पीक विमा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बजाज अलायन्स कंपनीने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी आ. कैलास_पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.मात्र अद्याप कोणता तोडगा निघाला नसल्यामुळे संतप्त तुळजापूर तालुक्यातील तमाम शिवसेनेच्या वतीने व शेतकरी बांधवांचा राष्ट्रीय महामार्ग तामलवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा व पिक विमा कंपनीचा जाहीर निषेध नोंदवला. यावेळेस शिवसेना महिला प्रमुख शामलताई वडणे यांनी यांनी झोपेचे सोंग घेतलेल्या शिंदे फडणवीस सरकारला निर्वाणीचा इशारा दिला की तात्काळ आमदार कैलास पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणाचा लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अन्यथा यापुढे तीव्र पडसाद उमटल्यास याची सर्वस्व जबाबदारी शासन व प्रशासन यांच्यावर राहील .

यावेळेस मा. उप जिल्हाप्रमुख शाम पवार,जगन्नाथ गवळी शिवसेना तालुका प्रमुख, मा.तालुकाप्रमुख बाळकृष्ण घोडके', पाटील तुळजापूर शिवसेना शहर प्रमुख सुधीर कदम, शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रदीप मगर ,सुनील जाधव ,संजय भोसले, गजानन चौगुले, रहित चव्हाण, शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर शिवसेना विभागप्रमुख बालाजी पांचाळ ,कृष्णा घोटकर, सुरेश ठाकर, अमोल घोटकर, अप्पू गवळी, पांडुरंग लोंढे, जितेंद्र माने, सोमनाथ गुड्डे ,माऊली शिंदे,बाळासाहेब शिंदे  उपशहर प्रमुख,विभाग प्रमुख तुळशीराम बोबडे, महेश सुरवसे, गणेश डोलारे,. आदीसह शेतकरी बांधव, शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते


Post a Comment

0 Comments