/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> निसर्गाच्या प्रकोपाने शेतकऱ्याची दिवाळी अंधारमय , अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी चिंतातुर, दिवाळीपूर्वी पिकविमा अग्रीम देण्याची शेतकऱ्यातून होत आहे मागणी

Hot Posts

निसर्गाच्या प्रकोपाने शेतकऱ्याची दिवाळी अंधारमय , अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी चिंतातुर, दिवाळीपूर्वी पिकविमा अग्रीम देण्याची शेतकऱ्यातून होत आहे मागणी

निसर्गाच्या प्रकोपाने  शेतकऱ्याची दिवाळी अंधारमय , अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी चिंतातुर, दिवाळीपूर्वी पिकविमा अग्रीम देण्याची शेतकऱ्यातून होत आहे मागणी


तुळजापुर/राजगुरू साखरे: यंदा तुळजापूर तालुका परिसरात सतत निसर्ग प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली नंतर सलग दोन महिने सततचा पावसाने खरिपातील पिकांची वाढ खुंटली, तसेच विविध कीड रोगाचा प्रादुर्भावामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, मध्यंतरी उघडीप दिली असली तरी सध्या सोयाबीन पिकांचे काढणी सुरू असताना परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे खरिपातील नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन पीक धोक्यात आली आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यावेळी सोयाबीनला मागच्या वर्षीच्या तुलनेत भाव  कमी व उत्पादनात मोठी घट आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दिवाळी सण तोंडावर आला असताना  सण कसा साजरा करायचा असा प्रश्न शेतकरी बांधवांना पडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सन २०२० चा रखडलेला पिक विमा व चालु सन २०२२ चा अग्रीम पिक विमा दिवाळीपूर्वी वाटप करण्यात यावा अशी मागणी शेतकरी बांधवातून होत आहे.


Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>