/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> वडिलांच्या पुण्यस्मरणाचा खर्च टाळून केली जिल्हा परिषद शाळेस पुस्तकांची भेट, नाईचाकूर येथील सागर वनकुद्रे यांचा प्रेरणादायी उपक्रम

Hot Posts

वडिलांच्या पुण्यस्मरणाचा खर्च टाळून केली जिल्हा परिषद शाळेस पुस्तकांची भेट, नाईचाकूर येथील सागर वनकुद्रे यांचा प्रेरणादायी उपक्रम

वडिलांच्या पुण्यस्मरणाचा  खर्च टाळून केली  जिल्हा परिषद शाळेस पुस्तकांची भेट,  नाईचाकूर येथील सागर वनकुद्रे यांचा प्रेरणादायी उपक्रम 


नाईचाकूर/बालाघाट न्युज टाइम्स: उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील सागर वनकुद्रे यांनी आपले वडिल  कै. दिगंबर वनकुद्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत येथील जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शाळांना ७५०० रुपयांची पुस्तके भेट देऊन प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचक दिन म्हणून साजरा केला जातो, याचे औचित्य साधून सागर वनकुद्रे यांनी हा  उपक्रम राबवण्यात आला,  वनकुद्रे कुटुंबाने राबवलेल्या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.या कार्यक्रमावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सतीश पवार हे होते प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच चंद्रकांत स्वामी, उपसरपंच बी. के. पवार ,डी.के .पवार, लक्ष्मण पवार माध्यमिक चे मुख्याध्यापक लक्ष्मण चव्हाण प्राथमिकचे मुख्याध्यापक संजय पवार ,राम पाटील ,पांडुरंग पवार ,दिलीप वनकुद्रे, श्रीमती त्रिशला वनकुद्रे ,सत्यवती इंगळे, संध्या जमालपुरे ,सविता लोखंडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल भावा यांनी केले आभार प्रदर्शन ज्योती आमले यांनी मांडले यावेळी विद्यार्थी शाळेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>