Hot Posts

6/recent/ticker-posts

 परतीच्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्या लांबणीवर, जमिनीत वाफसा  नसल्याने  ज्वारीच्या पेरण्या खोळंबल्या

तुळजापुर/बालाघाट न्युज टाइम्स:: यंदा उस्मानाबाद  जिल्हामध्ये अती पावसामुळे खरीपातील मुख्य व नगदी सोयाबीन पिकासह इतर  पिके हातातुन गेली असुन , रब्बीची पेरणी करणेही अवघड झाल्याचे सर्वत्र चित्र दिसत आहे.परतीच्या पावसामुळे ऐन राशीच्या वेळी हातात तोंडाशी आलेले पिके पाण्यात गेले.शेतकऱ्यानी सोयाबीनची काढणी केली असली तरी सततच्या पावसामुळे राशी होवू शकल्या नाहीत.अनेक ठिकाणी जागेवरच सोयाबीन वाया गेले तर अनेकांनी शेतात गंजी घालुन राशी करण्यासाठी मळणीयंत्रही घेऊन जाणे अशक्य झाले आहे.सध्या जिल्हासह व तालुक्यात १५ सप्टेंबर ते १५ आँक्टोंबर दरम्यान रब्बी ज्वारीची पेरणी केली जाते.पण सध्याच्या परतीच्या पावसामुळे जमीन वाफशावर येण्यापुवीँच पाऊस पडत असल्यामुळे ज्वारीची पेरणीची वेळ निघुन जात चालली आहे.. त्यामुळे यंदा ज्वारीच्या पेरणीत कमालीची घट होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे. मागील काही दिवसापासून होत असलेल्या परतीच्या पावसामुळे ओढे नाले ओसंडून वाहत आहेत, त्याचा परिणाम जमिनीत ओलावा संपत नसल्याने पेरणी करता येत नाही, त्यामुळे शेतामध्ये तण वाढले असुन  शेतकऱ्यांना तण काढण्यासाठी महागड्या तणनाशकाचा वापर करावा लागत आहे एकंदरीत यावर्षी खरीप हंगामातील सर्व पिके वाया गेल्याने आता शेतकऱ्यांची  रब्बीवर मदार आहे, त्यामुळे शेतकरी शेत शिवारात उरल्या सुरल्या सोयाबीनच्या राशी जमिनीची मशागती ,तण काढणे, आदी कामे उरकून लवकरात लवकर रब्बी पिकांची पेरणी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

------------------------------------------------------------



Post a Comment

0 Comments