तुळजापूर तालुक्यात परतीच्या पावसाचे थैमान, अस्मानी संकट कायम, होते नव्हते तेही पीक जाण्याच्या मार्गावर

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यात परतीच्या पावसाचे थैमान, अस्मानी संकट कायम, होते नव्हते तेही पीक जाण्याच्या मार्गावर


तुळजापुर/बालाघाट न्युज टाइम्स: पंधरा  दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा गुरुवारी तुळजापूर तालुका परिसरात सायंकाळच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास बरसलेल्या मुसळधार पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे प्रमाणावर नुकसान होत आहे. या पावसाने बळीराजाच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
यंदा तालुक्यात सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली, त्या पाठोपाठ ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सतत पाऊस, विविध कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, आता पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यावर अस्मानी संकट कायम असल्याचे पहावयास मिळत आहे. या पावसाने होते नव्हते तेही पीक हातचे जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. तालुक्यात मुख्यतः सोयाबीन पिकाला नगदी पीक म्हणून प्राधान्याने पाहिले जाते,सध्या सोयाबीन काढणीला सुरुवात झाली असून अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून ठेवले आहे मात्र गुरुवारी आलेल्या परतीच्या पावसाने हे सोयाबीन झाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. आधीच सततचा पाऊस, विविध कीड रोगाचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन पीक नष्ट झाले असताना आता उरले सुरले पिकही या पावसामुळे संपुष्टात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे .

Post a Comment

0 Comments