Hot Posts

6/recent/ticker-posts

येळकोट येळकोट जय मल्हारच्या जय घोषाने अणदुर नगरी दुमदुमली , खंडोबा यात्रेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी

 


उस्मानाबाद: येळकोट येळकोट जय मल्हार’च्या गजराने , खोबरं- भंडाऱ्याची उधळण करीत उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथील श्री खंडोबाची यात्रा पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात गुरुवारी दि,२४ रोजी पार पडली. श्री खंडेरायाच्या श्रीच्या पालखीचे राञी उशिरा नळदुर्ग मैलारपूरकडे प्रस्थान झाले आहे.  पहाटे पाच वाजता मैलारपूर मंदिरात खंडोबाचे  आगमन झाल्यानंतर तिथे  विधीवत प्रतिष्ठापना करण्यात येते. येथील यात्रेनिमित्त खंडोबाच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गुरुवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती, भाविकांसाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर मंदिरात तळी भंडार उचलणे, नवीन वारू, मुरळी यांना दीक्षा देणे,  जावळ काढणे, भंडारा खोबरे उधळणे, लंगर तोडणे, आदी कार्यक्रम पार पडले . यावेळी पंचक्रोशीतील वारू हलगीच्या तालावर बेभान होऊन नाचत होते  .सायंकाळी मानाच्या काठी मिरवणूक , धनगरी ओव्या गायनाचा कार्यक्रम झाला,

 


मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा साधेपणाने साजरी करण्यात आली होती मात्र यंदा निर्बंध मुक्त होत असल्याने  भाविकांनी सकाळपासूनच मोठी  गर्दी केली होती. सकाळपासूनच येळकोट येळकोट  जय मल्हार च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. तसेच रात्री उशीरा श्रींच्या मूर्तीचे मैलारपूर नळदुर्गकडे पावणेदोन महिन्याकरिता प्रस्थान करण्यात आले.



Post a Comment

0 Comments