उस्मानाबाद/राजगुरु साखरे: गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेली पोलीस मेगा भरती २०२२ मध्ये निघाली आहे, मात्र मागील तीन-चार दिवसापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी सर्वर डाऊन चा अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे विद्यार्थ्यां दिवस -राञ जागुन सायबर कॅफेवर फॉर्म भरत आहेत. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये १८ हजार ३३१ पोलीस शिपाई पदांची मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी अर्ज दाखल करण्यास सर्वर डाऊन चा खोडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून आता अवघे शेवटचे दोन दिवस अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक आहेत. मात्र हा अडथळा दूर होत नसल्याने हेलपाटे मारण्याची वेळ उमेदवारावर आली आहे. भरती प्रक्रियेसाठी नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज नोंदणी सुरू झाली ३० नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यामध्ये २१ दिवसाचा कालावधी अर्ज नोंदणी भरण्यासाठी देण्यात आला आहे सुरुवातीपासूनच महाआयटीच्या वेबसाईटवर सातत्याने काही तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. यामध्ये वेबसाईट खुली न होणे, वारंवार बंद पडणे , सुरुवातीची अर्ज भरण्याची प्रक्रिया पार केल्यानंतर पुढे शुल्क भरणा करण्यास अडचणी निर्माण येणे, अशा अनेक तांत्रिक समस्येचा वारंवार विद्यार्थ्यांना सामना करावा लागत आहे. ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी अवघ्या दोन दिवसाचा कालावधी विद्यार्थ्यांच्या हाती राहिला आहे. तरीही हा प्रश्न सुटलेला नाही त्यामुळे उमेदवारातून नाराजी व्यक्त होत आहे. कोरोना व अन्य कारणामुळे गेली तीन वर्षे पोलीस भरती प्रक्रिया झाली नाही. आता मेगा भरती सुरू झाली असली तरी या तांत्रिक समस्येचा सामना करावा लागत आहे. वेबसाईटवर आवश्यक ती गती मिळत नसल्यामुळे अनेक उमेदवारांचे अर्ज अर्धवट राहिलेली आहेत त्यामुळे पोलीस भरती ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेसाठी मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी उमेदवारातून होत आहे.
0 Comments