Hot Posts

6/recent/ticker-posts

बहुजन रयत परिषदेच्या उस्मानाबाद मीडिया सेल जिल्हाध्यक्षपदी सलगरे यांची निवड

 


तुळजापुर : इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच तरूनभारत , संचार , जनमत , शिवनिर्णय , आम संघर्ष  यासह अनेक वर्तमानपत्राचे इटकळ प्रतिनिधी दिनेश सलगरे यांची बहुजन रयत परिषदेच्या उस्मानाबाद मीडिया सेल जिल्हाध्यक्षपदी सोमवार  २८ नोव्हेंबर रोजी  बहुजन रयत परिषदेचे संस्थापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या सूचनेनुसार व प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नियुक्ती पत्र , शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन  निवड करण्यात आली आहे 

  ग्रामीण भागातील युवा पत्रकाराना वेळोवेळी मार्गदर्शन व सर्वोतोपरी सहकार्य करणारे संघर्षवादी व चळवळीतील  लढवय्या पत्रकार म्हणूनही तालुक्यात ते परिचित आहेत ग्रामीण पत्रकारितेच्या  क्षेत्रात कार्यरत असलेले व उत्तम दर्जाचे निर्भीड लिखाण करणारे दिनेश भाऊ सलगरे यांना यापूर्वी अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले होते त्यामध्ये पत्रकार सुरक्षा रक्षक समितीचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार त्यांना त्यांच्या सडेतोड लेखनाबद्दल मिळाला ,   तसेच  बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था यांचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार व कै शशिकांत जाधव यांच्या स्मरणार्थ ग्रामीण आदर्श पत्रकार पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले आहे

दिनेश सलगरे यांनी ग्रामीण भागात पत्रकारिता करत असताना त्यांनी खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील समस्या वृत्त पत्राच्या माध्यमातून राजकीय मंडळी व प्रशासनासमोर मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न गेल्या दोन दशकापासून करत आहेत तसेच प्रत्येकाच्या सुख दुःखाची प्रसिद्धी वर्तमानपत्रात करून सर्वाशी सकारात्मक वागणारे  दिनेश सलगरे यांच्या या सार्थ निवडीबद्दल तालुक्यातील राजकिय , सामाजिक , शैक्षणिक , पत्रकारिता , उद्योग व्यापार व इतर क्षेत्रातील मान्यवर यांच्याकडून अभिनंदन व कौतुक केले जात आहे यावेळी बहुजन रयत परिषदेचे सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर , पत्रकार दयानंद काळुंके , बबन गायकवाड , नामदेव गायकवाड , उमेश गायकवाड , अकिल मुजावर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होत.

Post a Comment

0 Comments