तुळजापुर/बालाघाट न्युज टाइम्स: मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सण साजरा करता आला नव्हता त्यामुळे यंदा निर्बंध मुक्त उत्सव साजरी होत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केल्यानंतर नोकरदार मंडळीसह विद्यार्थ्यांची शहराकडे जाण्याची लगबग सुरू झाली आहे. दिवाळी झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने एसटी महामंडळाची दिवाळी सुरू होते . त्यामुळे जिल्ह्यातील बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. दिवाळीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते त्यामुळे महामंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील नागरिक मुंबई ,पुणे ,औरंगाबाद, नागपूर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास असल्याने या मार्गावरील बस मध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्याचबरोबर खाजगी बस वाहने हंगाम पाहून अवाच्या सव्वा भाडे घेत असल्यामुळे व प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेत असल्यामुळे अनेक जण खाजगी बसने प्रवास करण्यास नापसंती दर्शविल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एकंदरीत सध्या एस टी महामंडळाच्या बस मध्ये सर्व सुविधायुक्त व आरक्षणाची सोय असल्यामुळे अनेक जण एसटी बसने प्रवास प्राधान्य देत आहेत.
0 Comments