Hot Posts

6/recent/ticker-posts

व्हाईस ऑफ मीडियाची उस्मानाबाद तालुका कार्यकारिणी जाहीर


उस्मानाबाद दि.१५(प्रतिनिधी) - व्हॉईस ऑफ मीडियाची उस्मानाबाद तालुका कार्यकारणी जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका अध्यक्ष अमजद सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली,सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देउन निवड दि १३ जानेवारी रोजी करण्यात आली आहे,

उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यामध्ये कार्याध्यक्षपदी सुभाष कुलकर्णी यांची तर उपाध्यक्ष सुमेध वाघमारे, असिफ मुलानी यांची तसेच सरचिटणीस रफिक पटेल, सहसरचिटणीस सचिन वाघमारे, कोषाध्यक्ष अमोल गायकवाड, कार्यवाहक विकास भोरे, संघटक प्रशांत सोनटक्के, प्रसिद्ध प्रमुख किरण कांबळे, सदस्य सलीम पठाण, जफरोद्दीन शेख, राहुल कोरे, शहेबाज शेख व अलाउद्दीन शेख यांचा समावेश आहे. 

यावेळी राजकीय कट्टा चे संपादक प्रा. सतीश मातने, जेष्ठ पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे,वाशी तालुका अध्यक्ष वैभव पारवे, पांडुरंग मते, प्रमोद राऊत, कुंदन शिंदे, विक्रम राठोड, विशाल खामकर, शाहरुख सय्यद, अल्ताफ शेख आदींसह पत्रकार सदस्य उपस्थित होत.

Post a Comment

0 Comments