Hot Posts

6/recent/ticker-posts

सरकारी नोकरीची गोडी, जमेना लग्नाची जोडी ! ग्रामीण भागातील सर्वसामान्य, शेतकरी तरुणांची बिकट अवस्था, वधूच्या प्रतीक्षेत हजारो वर !


उस्मानाबाद/राजगुरु साखरे : काळ बदलला तशी लग्नाची परिभाषा बदलली,मुलींची पसंती शासकीय नोकरदाराकडे वाढत चालली आहे. शिक्षण, नोकरी, व सेटल झाल्यावर लग्न अशी क्रमवारी लादुन घेतल्यामुळे वधू-वरांचे वय वाढले आहे , परिणामी जिल्ह्यात लग्नाळुंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे . अलीकडे ग्रामीण भागात मुलाने मुलगी पसंत केली तरी शेतकऱ्यांच्या मुलाला नोकरी नसल्याने नापसंती दर्शवली जात आहे. आपली मुलगी  आयुष्यभर ऐश्वर्यात रहावे , यासाठी मुलींचे आई-वडील शासकीय नोकरदार असलेल्या जावयाच्या शोधात आहेत. ग्रामीण भागात सर्वसाधारण शेतकरी मुलाला मुलगी देणे नापसंत करीत आहे, परिणामी "नवऱ्याला नवरी मिळेनाशी"झाली आहे.' सरकारी नोकरीची गोडी,जमेना लग्नाची जोडी', अशी अवस्था वरपक्षाची निर्माण झाली आहे. वधूपक्षांच्या ढीगभर अपेक्षेमुळे लग्नासाठी शेतकरी तरुणांची अवस्था बिकट झाली आहे. मुलाकडे भरपूर शेती असावी पण शेतकरी नवरा नको अशी अट मुलींकडून घातली जात आहे. पूर्वी लग्न जुळवताना फारसा विचार केला जात नव्हता, मात्र बदललेल्या परिस्थितीमुळे लग्न करताना सर्वच गोष्टींचा सांगोपांगपणे उलगडा करीत आहेत. त्यामुळे सहाजिकच वर पक्षाला लग्न करताना कसरत करावी लागत आहे. सुधारित राहणीमान, मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा यामुळे सर्वसामान्य मुलाला लग्न करताना अनंत अडचणी येत आहेत.आता मुलीही शिकू लागल्या आहेत, उच्च शिक्षण घेऊन नोकरी करू लागले आहेत, पूर्वी कुटुंबासाठी भार असणाऱ्या मुली आता कुटुंबाच्या आधार होऊ लागले आहेत.

परिणामी मुलींच्या  अपेक्षा वाढल्याचं आहे, काही मुली नोकरी करत असल्यामुळे आपला जोडीदारीही नोकरदारच हवा अशी अट घालत आहेत. त्यातही त्याला शासकीय नोकरी असावी या भूमिकेमुळे शेतकरी व सर्वसामान्य खाजगी नोकरी करणाऱ्या तरुणांचे फार अवघड होत आहे.परिणामी ' हुंडा नको, मामा, फक्त मुलगी द्या मला 'अशी विनवणी करण्याची वेळ  तरुणांवर व कुटुंबावर आली आहे.


Post a Comment

0 Comments