Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथील पाटिल विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


चिवरी  :-तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील दत्तु आण्णा पाटील माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.   यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन वर्षाताई राम कदम व प्रमुख पाहुणे म्हणून  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समितीचे सभापती मनीषा पोपटराव पाटील हे होते.यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच निर्मला लबडे, ग्रामपंचायत सदस्य भिमा देडे, दिपक पाटील,लक्ष्मण लबडे, पिंटू बिराजदार, विष्णूपंत परिट, वसंत काळजाते  यांची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते,लोकगीते,कोळीगीते,मराठी पारंपरिक गीते,भारुड,छत्रपती शिवाजी महाराज जीवनावरील नाटीका,भांगडा,गोंधळी गीते,खंडोबा जागरण गोंधळ,नकला,आदी सादर करून उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.ए.मस्के यांनी केले.प्रास्ताविक मुख्याध्यापक बिराजदार एल.के यांनी तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख शहाजी शिंदे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहाजी शिंदे, सुर्यवंशी के.एस, शिंदे एस,ठाकूर के.पी,ढगे मॅडम, शिंदे वी.वी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरम या गीताने झाला.यावेळी विद्यार्थी, महिला,पुरुष पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments