Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवचरित्रातील विचारांचे संस्कार मुलावर रुजवावे- प्रा. विशाल गरड

प्रा.विशाल गरड सर.

चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे शिवछत्रपती तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्ताने दि,२४ रोजी शिवचरित्रकार प्रा. विशाल गरड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रा. श्री . गरड म्हणाले की मुलांना लहानपणापासूनच शिवचरित्र वाचायला शिकवून , शिवचरित्रातील विचाराचे संस्कार मुलावर रुजवावे यामुळे चांगले शिवभक्त तयार होतील , त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये मुलींचा जन्मदर घटल्यामुळे मुलांना मुलगी मिळणे कठीण झाले आहे त्यामुळे स्ञी जन्माचे स्वागत करा, स्ञियांचे पाविञ्य जपा, स्त्रियांचा आदर करा, व्यसनापासुन दुर रहावे,आई-वडिलांचा सांभाळ करावा अशा वेगवेगळ्या विषयावर प्रा.गरड सरांनी मार्गदर्शन केले.यावेळी या कार्यक्रमास ग्रामस्थ महिला, शिवभक्त, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होत.




बातमी व जाहिरातीसाठी
 संपर्क राजगुरु साखरे-९८८१२९८९४६

Post a Comment

0 Comments