Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोना नंतरच्या शासकीय नोकर भरती सेवेकरिता प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांच्या वयोमर्यादेत वाढ कदा - आप ची मागणी...


तुळजापुर: कोरोना नंतर च्या शासकीय नोकरी भरती सेवेकरी प्रयत्न करणार्या उमेदवार वयोमर्यादेत वाढ करण्यात यावी या साठी तुळजापूर नायब तहसीलदार मार्फत 

राज्य चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडे तुळजापूर तालुका आम आदमी पार्टी वतीने यांच्यावतीने निवेदन  पाठवून दिले आहे कोरोनंतर च्या कालावधी मध्ये निघणाऱ्या शासकीय नोकर भरती करिता प्रयत्न करणाऱ्या सुशिक्षीत बेरोजगार उमेदवाराना वयोमर्यादेत किमान २-३  वर्ष वाढ द्यावी . 

   गत दोन वर्षापासून शासकीय सेवेत भरती होउ इच्छिणार्या उमेदवारांना कोरोना कालावधीत नोकरभरती नसल्याकारणाने निराशा निर्माण झाली होती .पण सध्या सर्व व्यवस्थीत असुन ज्या उमेदवारांनी वयोमर्यादा ओलाडले असल्याकारणानें त्यांना शासना च्या सेवेत भरती होता येत नाही. तरी इच्छुक उमेदवाराच्या वयोमर्यादेत वाढ करावी जेनेकरून त्यांचे शासकीय सेवा करण्याचे स्वप्न पुरे होईल .

 कोरोना कालावधी नंतर वयोमर्यादेत एक वर्ष वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता पण या कालावधीत अत्यंत कमी नोकरीच्या जाहिराती आल्या डिसेंबर २०२२ पर्यंत तो कालावधी संपला त्याचा फारसा फायदा झाला नाही तरी शासनाने वाढीव संधी दयावी कारण, राज्य सरकारने पोलीस भरतीसाठी दोन वर्ष वयात सवलत दिली आहे पण राज्यसेवा एमपीएससी व सरळसेवा परिक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांना एक वर्ष हा अन्याय असुन शासनाने वयोमर्यादत  किमान  २ ते ३ वर्ष वाढ करावी  व शासकीय सेवेत कार्य करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना  संधी द्यावी हि मागणी करित आहोत,कारण   कोरोना कालावधी नंतर शासकीय नोकरी मध्ये इतर राज्यांनी उमेदवाराच्या वयोमयादेत वाढ केलेली आहे त्यात अनुकमे - राजस्थान ४ वर्ष,मध्यप्रदेश ओडिसा ३ वर्ष, आंध्र प्रदेश तेलंगाना त्रिपुरा नागालँड २ वर्ष वयामध्ये वाढ केलेली आहे .याच धरतीवर महाराष्ट्रा मध्ये शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांना किमान २-३ वर्ष वयामध्ये वाढ करून सवलत द्यावी त्याचा फायदा असंख्य उमेदवाराना होईल .

   अशी मागणी तुळजापूर तालुका अध्यक्ष आप चे मधुकर शेळके यांनी निवेदन दिले आहे

Post a Comment

0 Comments