चिवरी:तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी यात्रेत लाखो भाविकांनी घेतले दर्शन यावेळी आराधी, वाघ्या, मुरळी पोतराज गीताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.यात्रेची मंगळवार दि,७ फेब्रुवारी रोजी यात्रेची सुरुवात झाली,दोन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून हजारो भाविक दाखल झाले होते. यात्रेनिमित्त सोमवार व मंगळवार च्या मध्यरात्री १२:३० वाजता देवीचा अभिषेक व महापूजा आरती करण्यात आली. यानंतर गाव ते मंदिर या एक किलोमीटर अंतरावर दंडवत व लिंबाच्या पाल्याने रस्ता झाडण्यात आला. यामध्ये गावातील शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवला होता.मंगळवारी दिवसभरात मानकरी वाणी पाटील ,मराठा पाटील यांच्या वाड्यावर जाणे घोंगड्यात भात झेलणे यासह मानपानाची विधी पार पडले, गावामधून रात्री शोभेच्या दारू कामासह देवीचा पालखी छबिना मिरवणूक काढण्यात आली. यानंतर रात्री दहा वाजता होमामध्ये धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला, यात्रेनिमित्त मंदिरापासून ते स्नानगृहापर्यत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मागील वर्षी यात्रेमध्ये पारधी समाजातील दोन गटात झालेल्या हाणामारीमुळे यंदा प्रथमच पारधी समाजातील भाविकांनी यात्रेमध्ये अत्यल्प सहभाग नोंदवल्याचे दिसून आले. कोरोना नंतर पहिल्यांदाच मोठी यात्रा भरत असल्याने राज्यासह पर राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल होत आहे, सकाळपासूनच मंदिर परिसरात आई राजा उदो उदो च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. यात्रेसाठी तुळजापूर येथील विभागीय पोलीस अधीक्षक डॉ. सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सपोनि सिद्धेश्वर गोरे यांनी कर्मचाऱ्यांसह तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0 Comments