Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा राज्य सरकारकडून प्रती क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर


मुंबई :कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ५०० किलोमागे अवघे २ ते ३ रुपये मिळाल्याच्या अनेक प्रसार माध्यमातून बातम्या समोर आल्या होत्या. याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता ३०० रुपये सानुग्राह अनुदान मिळणार असल्याचे आज त्यांनी विधानसभा कामकाजाला सुरुवात होताच सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति क्विंटल २०० रुपये अनुदानाची शिफारस करण्यात आली होती, पण आपण ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

विरोधी पक्षाने मात्र सरकारने प्रति क्विंटल ३०० रुपये अनुदान जाहीर केले आहे, ते अत्यंत तुटपुंजे आहे. कांदा उत्पादनास येणाऱ्या खर्चाचा विचार करून सरकारने हे अनुदान किमान ५०० रुपये करावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात  यांनी केली आहे.




Post a Comment

0 Comments