तुळजापूर/ प्रतिनिधी: तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ येथील सखी ब्युटी पार्लरच्या सौ.मधुराताई सलगरे यांना बाभळगाव येथील संत तुकाराम सामाजिक संस्थेच्यावतीने जिल्हास्तरीय आदर्श नारी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
महिला जागतिक दिनाचे औचित्य साधून बाभळगाव येथील संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या वतीने इटकळ येथील विवांता रिसाॅर्ट येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा जिल्हास्तरीय आदर्श नारी जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आधुनिक लहुजी सेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा नगीनाताई कांबळे , धाराशिव जिल्ह्याचे क्षयरोग अधिकारी डॉ रफीक अन्सारी,नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने, विशाखा समीती जिल्हा अध्यक्ष बाबई चव्हाण,संस्थेचे अध्यक्ष दयानंद काळुंके , विलास काळुंके , सोलापूर येथील शिवानंद पल्ली,धरीत्री विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता शहा, वैशाली आवाड, इटकळच्या सरपंच राजश्री बागडे, सुरेखा कांबळे, डॉ .संतोष पवार , आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सखी ब्युटी पार्लरच्या सौ.मधुराताई दिनेश सलगरे यांना जिल्हास्तरीय आदर्श नारी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सखी ब्युटी पार्लरच्या सौ मधुराताई सलगरे यांना आदर्श नारी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केल्या बद्दल गाव परिसरातील महीला वर्गातून अभिनंदन केले जात आहे.
0 Comments