धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील उमरगा चिवरी येथील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला खिंडार पडले आहे.
यामध्ये सरपंच श्सर्वेश्वर पाटील, सदस्य महादेव वडजे, रोहिणीताई सावंत, लक्ष्मीताई चाफे, पॅनलप्रमुख व्यंकटराव सावंत व अल्लाउद्दीन इनामदार यांच्यासह माजी सदस्य .शाहूराज कदम, सुभाष घोडके, ठाकरे गटाचे शाखा प्रमुख ,भीमराव जाधव, शाखा अध्यक्ष ,.नागनाथ वडजे, सदस्य ,मौला इनामदार, .तानाजी सावंत, .गणेश सावंत, अविनाश कदम, .राम कदम, .दीपक परीट, .स्वप्नील शितोळे, स्वप्निल वडजे, .वैभव वडजे, म्हाळाप्पा लाप्पा चाफे, शंकर चाफे, सोमनाथ वडजे, अण्णा वडजे आदी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे भाजपात स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अॅड.दीपक आलुरे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष दयानंद मुडके यांनी परिश्रम घेतले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा संयोजक नेताजी पाटील, तालुकाध्यक्ष ,संतोष बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष .,विक्रमसिंह देशमूख, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, पिंटू बिराजदार यशवंत लोंढे आदीसंह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत.
0 Comments