Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतीच्या वादातून आठ वर्षाच्या सावत्र भावाचा गळा आवळून खून , संशयीत आरोपीला पोलिसांकडून ताब्यात


जालना: शेतीच्या वादातून आठ वर्षाच्या सावत्र भावाचा मोठ्या भावाने गळा दाबून खून केल्याचे गुरुवारी दुपारी (दि,२३ ) रोजी अंबड तालुक्यातील भारडी येथील कुढेकर वस्तीवरील उसाच्या शेतात उघडकीस आले आहे. विराज तुकाराम कुढेकर असे मृताचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की भारडी येथील तुकाराम कुढेकर यांना दोन पत्नी आहेत, यापैकी पहिली पत्नी ही छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास आहे त्यांना ऋषिकेश कुढेकर नावाचा वय(१८)  मुलगा आहे, तर दुसरी पत्नी कावेरी या तुकाराम कुढेकर यांच्या समवेत भारडी येथे राहतात. त्यांना विराज कुढेकर नावाचा एक मुलगा एक मुलगी आहे, पहिल्या पत्नीचा मुलगा ऋषिकेश हा छत्रपती संभाजी नगर येथे राहत होता. परंतु गेल्या तीन महिन्यापासून तो भारडी येथे राहण्यासाठी आला होता. गुरुवारी दुपारी मृत विराज कुढेकर व ऋषिकेश हे दोघे उसाच्या शेताकडे गेले होते, तेव्हा संशयीत ऋषिकेशने विराज याचा गळा आवळून खून करून त्याच्या नाकात तोंडात चिखल घातलेला होता. अशी माहिती ग्रामस्थांनी गोंदी पोलीसांना दिली. 

यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, यामध्ये पोलिसांनी संशयीताना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे


Post a Comment

0 Comments